Monday, May 3, 2010

संगणकावर "सोप्पी मराठी' लिहिण्यासाठी!

मराठीचा संगणकातला वापर सोपा व्हावा यासाठी गेली काही वर्ष वेगवेगळ्या पातळ्यावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे "शोध मराठीचा'तर्फे नुकतीच एक सीडी प्रकाशित करण्यात आली. त्याबद्दल-
----
"शोध मराठीचा' टीम
---
"सोप्पी मराठी'च्या अंतरंगातील काही महत्त्वाच्या गोष्टी1. "हवेवर ओठांनी लिहिले तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे आणि संगणकीय फॉण्टने अर्थातून विहरावे' या "शोध मराठीचा' संशोधनाच्या सिद्धान्ताला अनुसरून निर्माण केलेला पहिला टप्पा म्हणजे "सोप्पी मराठी' होय.2. संगणकात चिरकालीन टिकणारा, मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्यांच्या विविध ऍप्लिकेशन्समध्ये चालणारा. 100 टक्के मराठी फॉण्ट "गांगल 1'चा वापर "सोप्पी मराठी' या उपक्रमात केलेला आहे. "गांगल 1' फॉण्ट आणि "सोप्पी मराठी' ही जोडगोळी मराठीच्या "आश्‍चर्यकारक सहजसुलभ संगणकीय वापरासाठी' अत्यावश्‍यक ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे. "मराठीच्या संगणकीय प्रमाणीकरणाचा सूत्रधार' म्हणजे "गांगल 1 फॉण्ट + सोप्पी मराठी' होय.3. आपण ध्वनीच्या उच्चारातून जे प्रदर्शित करतो, ते सर्व लेखनातून कागदावर गोंदविता येत नाही. पण "संगणकीय लेखनाचा' उपयोग; त्यानंतर त्यावर करता येणाऱ्या "ऍप्लिकेशन्सच्या ऍटेचमेंटस्‌'च्या संस्कारांसह विविधतेने करता येतो. "सोप्पी मराठी' हा त्यातील एक टप्पा आहे. हा प्रवास इथेच थांबणार नसून मराठीला करता येणाऱ्या "संगणकीय आंदोलनाची' ही सुरुवात आहे.4. स्वर-अक्षर "हवेवर ओठांनी लिहिताना' आपण निव्वळ स्वराचा उच्चार करतो. "अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः' असे स्वर मराठीत आहेत. या स्वरांसाठीची चिन्हे व्यंजनाला लावली, की व्यंजन-अक्षरे बनतात. "व्यंजनाला जोडता येणाऱ्या एका स्वराचे एक चिन्ह एकाच चावीतून संगणकात उमटावे' आणि "प्रत्येक व्यंजनाला योग्य ठिकाणी जोडले जावे', अशी सोय "सोप्पी मराठी'ने केली आहे.5. "इ, उ व ए' यांची दीर्घ रूपे संगणकात गोंदविण्यासाठी "इ'साठीचा रफार, "उ'साठीचा दीर्घ-उकार व "ए'साठीची मात्रा शोधावी लागते. "सोप्पी मराठी'ने या मानसिक त्रासातून मुक्तता देण्यासाठी "इ'चे चिन्ह दोनदा दाबले की "ई', "उ'चे चिन्ह दोनदा दाबले की "ऊ' व "ए'चे चिन्ह दोनदा दाबले की "ऐ' साकारेल, असे घडविले आहे. उच्चारासाठी जिभेचा वापर मेंदूने दिलेल्या आज्ञेनुसार सहजतेने होतो. "की-बोर्डवरील चाव्या आणि आपली मराठी-बोटे' यातील सहजता "मराठीच्या संगणकीय मानसिकतेतून' जाणून "शोध मराठीचा' संशोधनाने "सोप्पी मराठी' घडविली आहे. मराठी भाषेच्या "ध्वनी-वृत्ती'ला तिच्या "कागदी-वृत्ती'पर्यंत देवनागरी लिपी पोचविते. देवनागरी लिपीमुळे मराठीला एक विवक्षित "कागदी-वृत्ती' मिळते. त्यातून निर्माण होणाऱ्या मराठीच्या "संगणकीय-वृत्ती'नुसार तिच्या टायपिंगला आश्‍चर्यकारक सहजसुलभता देण्याचे काम "सोप्पी मराठी' करीत आहे.6. व्यंजनानंतर "र' हे व्यंजन आले, तर ते मराठीत "प्र', "क्र', "ड्र' असे भिन्नपणे लिहिले जाते. त्यासाठी संबंधित चिन्ह व्यंजनाला कसे व कोठे जोडायचे यासाठी टायपिंग करणाऱ्या बोटांना' विचार करावा लागतो. हे सोपे व्हावे यासाठी तशी सोय मूलभूत फॉण्टमध्येच दिली जात असे. "टायपिंग करणाऱ्या बोटांचा विचार' मूलभूत फॉण्टने केल्याने मराठीच्या संगणकीय वापरासाठीची एकूण चिन्हे 94 पेक्षा जास्त भरतात. संगणकाच्या अंतर्गत प्रस्थापित व्यवस्थेचा उपयोग करून घेण्याच्या क्षमतेवर असंख्य मर्यादा येतात. "आजचा संगणक आणि त्यातील विविध रचना', इंग्रजी भाषेच्या ठेवणीला अनुसरून घडविल्या गेल्या आहेत. मराठीने याच पद्धतींचा वापर करण्यावाचून आज तरी दुसरा मार्ग उपलब्ध नाही. मराठी फॉण्टची व्याख्याच "शोध मराठीचा' संशोधनाने बदलली आहे. 100 टक्के मराठी चिन्हे उपलब्ध करणे, "तो चिरकालीन चालण्याची व्यवस्था निर्माण करणे', "संगणकाच्या विविध पद्धतींतून ती व्यवस्थित चालणे अशा असंख्य गोष्टी म्हणजे "मूलभूत फॉण्ट' होय. अशा मराठी "मूलभूत फॉण्ट'च्या "टायपिंग करणाऱ्या बोटांना' सहजसुलभता प्रदान करणे हा त्यानंतर साध्य करता येणारा भाग ठरतो. "टायपिंग करणाऱ्या बोटांना' मराठीचा "गद्य, पद्य व संगीत' यातून साकारणाऱ्या अगणित अर्थ-निर्मितीपर्यंत पोचता यावे, यासाठीची सूत्रे "सोप्पी मराठी'सारख्या तंत्रातून मार्गस्थ करता येतात.7. "सोप्पी मराठी'ने "मराठी टायपिंग सोपे केले' आहे. त्याला "अपडेट'ची जोड द्यायचा विचार आहे.8. "सोप्पी मराठी'मुळे आनंदाने मराठी लिहिणारा समाज निर्माण होईल. मराठी सोपे, सहजसुलभ व आनंददायी ठरेल. मराठी भाषेच्या प्रगतीचा हा महत्त्वाचा टप्पा ठरतो, असे आम्हाला वाटते.-

No comments:

Post a Comment